Current Affairs
‘इस्रो’ कडून ‘एनव्हिएस-1’ चे यशस्वी प्रक्षेपण
- 30/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
मंगळयान, चांद्रयान अशा मोहिमांनी अंतराळ क्षेत्रात भरारी घेणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेलने (इस्रो) ‘नाविक’ मालिकेतील ‘एनव्हिएस-1’ हा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडला.
श्रीहरीकोटामधील सतीश धवन अवकाश संस्थेतील ‘जीएसएलव्ही एफ12’ प्रक्षेपकाच्या साहाय्याने ‘एनव्हीएस – 01’ चे चे प्रक्षेपण 29 मे रोजी सकाळी 10 वाजून 42 मिनिटांनी करण्यात आले.
‘ इस्रो’ ने हे 2023 मध्ये केलेले पाचवे उड्डाण आहे.
भारताच्या ‘नेविगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन (नाविक) या मोहिमेत समाविष्ट करण्यात येणारा हा दुसऱ्या पिढीतील उपग्रह आहे.
देशाची दिशा दर्शनाची क्षमता वाढवण्याचा उद्देश या मोहिमेचा आहे. अचूक आणि वास्तव दिशादर्शन यातून केले जाणार आहे.
दिशादर्शक उपग्रहाचे प्रथमच ‘जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (जीएसएलव्ही) मार्फत प्रक्षेपण करण्यात आले.
‘एनव्हीए-01 ‘या उपग्रहाचे वजन 2,232 किलो आहे . भारताच्या प्रादेशिक नेवीगेशन सॅटेलाइट सिस्टीम (आयआरएनएसएस) कॉन्स्टेलेशनमध्ये सात उपग्रह आहेत. त्यात एनव्हीएस-01’ हा सर्वात वजनदार उपग्रह आहे.
बाकी उपग्रहांचे प्रक्षेपणाच्यावेळेचे वजन 1425 किलो होते. ते सर्व उपग्रह पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही) या प्रक्षेपकाद्वारे अवकाशात सोडले होते.
‘ नाविक’ उपग्रहांचा वापर हा जमीन ,हवाई आणि सागरी वाहतूक, स्थळ आधारित सेवा, वैयक्तिक हालचाल, स्त्रोत निरीक्षण, सर्वेक्षण आणि भूविभाग, शास्त्रीय संशोधन, वेळेचे समायोजन करणे, सुरक्षित जीवन सूचना प्रसार इत्यादींसाठी केला जातो .
देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राची स्थिती, दिशादर्शन आणि वेळ याबाबत वाढत्या गरजा भागवण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
उपग्रहावर आधारित प्रादेशिक दिशादर्शन प्रणाली असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे.
उड्डाणाची वैशिष्ट्ये:
एनव्हिएस-1 भारत आणि मुख्य परीसरातील सुमारे 1,500 किलोमीटर क्षेत्रातील तात्कालिक स्थिती आणि वेळसंबंधी सेवा देणार
जीएसएलव्हीचे 15 वे प्रक्षेपण
‘एनव्हिएस-1’ वजन 2,232 किलो
प्रक्षेपणानंतर 20 मिनिटांनी 251 किलोमीटर उंचीवरील भुस्थिर स्थानांतर कक्षेत स्थापन
‘एल1’, ‘एल5’ आणि ‘एस बँड’ ह्या उपकरणांसह ‘एनव्हीएस-1’ चे प्रेक्षपण
प्रेक्षपणावेळी पहिल्यांदाच स्वदेशी रुबीडीयम आण्विक घड्याळाचा वापर
ISRO :- Indian Space Research Org.
(भारतीय अवकाश संशोधन संस्था )
स्थापना : 15 ऑगस्ट 1969
संस्थापक : डॉ. विक्रम साराभाई
अध्यक्ष : एस. सोमनाथ (10वे)
मुख्यालय : बंगळुरू