केंद्र सरकारच्या अखात्यारीत असलेल्या सक्तवसुली संचलनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना व्यापक जनहित लक्षात घेऊन 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
या मदतीनंतर मात्र संचालक म्हणून मिश्रा यांना मुदतवाढ मिळणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले .
गेल्या 11 जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार संचालक एस. के. मिश्रा यांची मुदत 31 जुलैला संपणार होती.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवळी न्यायाधीश विक्रमनाथ व न्यायाधीश संजय करोल यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारने संचालक म्हणून एस. के. मिश्रा यांना मुदतवाढ देण्याची मागणी अंशतः स्वीकारली.