Current Affairs
चीनच्या ‘शेंझोऊ-16 ‘ यानाचे यशस्वी प्रक्षेपण
- 31/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
चीनने 30 मे रोजी शेंझोऊ- 16 या अवकाशयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
चीनच्या अवकाशस्थानकाच्या दिशेने झेपावलेल्या या अवकाशयानात तीन अंतराळवीर असून त्यापैकी एक जण सामान्य नागरिक आहेत.
पाच महिन्यांच्या मोहिमेसाठी एका सामान्य व्यक्तीला अवकाशात पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुई हैचाओ असे या व्यक्तीचे नाव असून ते बीजिंगमधील बेहांग विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
चीनच्या वायव्य भागातील जीऊक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून लॉन्ग मार्च-2एफ या प्रक्षेपकाच्या मदतीने ‘शेंझाऊ-16’ चे प्रक्षेपण करण्यात आले.
पृथ्वीपासून 400 km उंचीवर असलेल्या या अवकाशस्थानकाच्या तिआन्हे मॉड्युल या भागात तिन्ही अंतराळवीर राहणार आहेत.
प्राध्यापक गुई हैचाओ हे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ आहेत.
अंतराळव्यतिरिक्त अवकाशात उड्डाण करणारे ते पहिले चिनी व्यक्ती ठरले आहेत. तसेच, या मोहिमेचे प्रमुख झिंग हेपेंग यांची चौथ्या वेळेस अवकाशात जाणारे पहिले चिनी अंतराळवीर म्हणून नोंद झाली आहे.