Current Affairs
जगातील पहिल्या बीएस 6 स्टेज II ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईपचे उद्घाटन
- 01/09/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 29 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे जगातील पहिल्या बीएस 6 स्टेज II ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईपचे उद्घाटन केले.
हे वाहन टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने विकसित केले आहे.
या कार्यक्रमाला, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे, टोयोटा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासाकाझु योशीमुरा, किर्लोस्कर सिस्टिम्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली किर्लोस्कर,जपानच्या दूतावासातील राजदूत, सरकारी अधिकारी यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.
उद्घाटन झालेले हे अभिनव पद्धतीचे वाहन इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे आणि त्याची निर्मिती करताना भारताच्या अधिक कठोर उत्सर्जनविषयक मानकांची पूर्तता करण्यात आली आहे.
त्यामुळे ते जागतिक पातळीवरील सर्वात पहिले बीएस 6 (पातळी 2) ‘इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल वाहनाच्या’ प्रोटोटाईप वाहन ठरले आहे.