Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > जलसंवर्धनात महाराष्ट्र अव्वलस्थानी
जलसंवर्धनात महाराष्ट्र अव्वलस्थानी
- 27/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
● केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिल्याच अहवालात महाराष्ट्राने जलसंवर्धन योजनांच्या बाबतीत अव्वलस्थान प्राप्त केले आहे.
● वॉटर बॉडी सेन्सेसच्या अहवालानुसार देशात असलेल्या 24 लाख 24 हजार 450 जलसाठयांपैकी 97.1% जलसाठे ग्रामीण भागात तर केवळ 2.9 % जलसाठे शहरी भागात आहेत.
महाराष्ट्रातील आकडेवारी
● महाराष्ट्रात एकूण 97,062 जलसाठे आहेत.
● राज्यातील जलसाठयांपैकी 898 तलाव, 3,797 तळे, 350 तलाव, 358 जलाशय, 90,023 जलसंवर्धन योजना, पाझर तलाव, धरणे आहेत. त्यातील 99.3 % (96 हजार 343) ग्रामीण भागात, तर 0.7%(719) शहरी भागात आहेत.
● 99.7% (96,767) जलसाठे सरकारी मालकीचे आणि 0.3% (295) जलसाठे खासगी मालकीचे आहेत.
● 574 जलसाठे नैसर्गिक, तर 96,488 जलसाठे मानवनिर्मित आहेत.
● राज्यातील जलसाठयांपैकी 52.7% जलसाठे राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत, तर 42.7% जलसाठे पंचायतींच्या अखत्यारीत आहेत.
● पाण्याच्या वापरामध्ये सर्वाधिक 77.3% भूजल पुनर्भरण , 13% घरगुती वापर किंवा पाण्यासाठी, 8.3 % पाटबंधारे कामासाठी होत असल्याची मांडणी अहवालात करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तळी
● पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक संख्येने तळी आणि इतर जलासाठे आढळले आहेत.
● देशातील विविध राज्यांमधील टाक्यांच्या संख्येचा विचार करता आंध्र प्रदेशात त्यांची संख्या सर्वात अधिक असल्याचे दिसून आले.
● देशातील सर्वाधिक तलाव तमिळनाडूमध्ये आहेत.
● दमन-दीव, दादरा, नगर हवेली, लक्षद्वीप हे भाग वगळता देशातील इतर 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जलाशयांची ही पहिली गणना झाली.