Current Affairs
निधन : अरुण गांधी
- 03/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
महात्मा गांधी यांचे नातू, लेखक, अहिंसेचे पुरस्कार ते सामाजिक कार्यकर्ते अरुण गांधी यांचे वयाच्या 89 व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले .
कोल्हापुरातील ‘अवनी’ या सामाजिक संघटनेशी त्यांचे गेले वीस वर्षे निकटचे संबंध होते. या संस्थेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अल्पपरिचय:
अरुण गांधी हे शांतता कार्यकर्ते वक्ता आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होते.
त्यांचा जन्म 14 एप्रिल 1934 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला.
ते महात्मा गांधी यांची पाचवे नातू होते.
त्यांनी सेवाग्राम येथे आजोबांसोबत दोन वर्षे व्यतीत केली असता तेथे त्यांना अहिंसा स्वतंत्र लढ्याबद्दल माहिती मिळाली.
दक्षिण आफ्रिकेत वाढलेल्या अरुण गांधी यांनी वर्णभेद, भारतीय स्थलांतरितांविरुद्ध भेदभाव, हिंसाचार यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
1956 मध्ये ते पत्रकार म्हणून काम करण्यासाठी भारतात आले .
1960 मध्ये भारताचे नागरिक बनले.
त्यांनी पत्रकार आणि संपादक म्हणून काम केले.ते ‘पत्रकार’ आणि ‘इंडियन ओपिनियन’ चे संपादक होते.
अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर 1987 मध्ये त्यांनी एम. के. गांधी इन्स्टिट्यूट फॉर नॉनव्हायोलन्स इन मेमफिस संस्था स्थापन केली
अरुण गांधी यांची पुस्तके
1) ‘द गिफ्ट ऑफ अँगर: अँड अदर लेसन फ्रॉम माय ग्रँड फादर महात्मा गांधी’
2) लिगसी ऑफ लव्ह
3) बी द चेंज – अ ग्रँडफादर गांधी स्टोरी
4) डॉटर ऑफ मिडनाईट
आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
‘अवनी’ संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूरशी दिर्घकाळ संबंध:
अरुण गांधी हे कोल्हापुरातील ‘अवनी’ संस्थेचे संस्थापक अरुण चव्हाण यांचे जवळचे मित्र होते.
उपेक्षित,शोषित मुलांच्या काळजी, संरक्षणासाठी अवनी संस्थेची स्थापना झाली आहे.
अरुण गांधी यांनी 2008 मध्ये ‘गांधी वर्ल्डवाईड एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ ची स्थापना केली. त्याद्वारे अवनी संस्थेला अमूल्य सहकार्य केले.
निधन : 2 मे 2023