दिल्लीतील तीन मूर्ती भवनातील ‘नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय चे नाव वगळण्यात आले असून पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालय असे नामांतर करण्यात आले आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री व नेहरू संग्रहालयाच्या समितीचे उपाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नेहरू समृद्धी संग्रहालय व ग्रंथालयाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचे निवासस्थान राहिलेल्या तीन मूर्ती भवनाचे रूपांतर नेहरूंच्या पश्चात्य संग्रहालय व ग्रंथालयामध्ये करण्यात आले होते.
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्याच आवारात देशाच्या सर्व पंतप्रधानांना अर्पण केलेल्या नव्या संग्रहालयाचे लोकार्पण 21 एप्रिल 2022 रोजी मोदींच्या हस्ते झाले होते.