Current Affairs
बिपरजॉय ठरले अरबी समुद्रातील दुसरे सर्वाधिक तीव्र चक्रीवादळ
- 12/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
अरबी समुद्रात वाढत्या तापमानामुळे पूर्व मौसमी चक्रीवादळांच्या निर्मितीबरोबर त्याची तीव्रताही वाढू लागली आहे. त्याच धर्तीवर जून महिन्यात अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची स्थिती पाहता बीपरजॉय हे दुसरे सर्वाधिक तीव्र चक्रीवादळ ठरले आहे.
हे 1982 पासून आजवर जून महिन्यात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांपैकी एक तीव्र चक्रीवादळ असल्याचे ‘जॉईंट टायफून वॉर्निंग सेंटर’ संस्थेने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.
अरबी समुद्रात 6 जून रोजी बिपरजॉय चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. त्या चक्रीवादळाची अतितीव्रता मध्ये रूपांतर झाले आहे.
उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा अभ्यास करणाऱ्या जेजु येथील जेटीडब्ल्यूसी या संस्थेद्वारे ही माहिती दिली आहे.
त्यानुसार जून 2007 मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या गेनू हे 1982 पासून ते आतापर्यंतचे सर्वाधिक तीव्र चक्रीवादळ ठरले होते.
एकाच वर्षात दोन तीव्र चक्रीवादळे
हिंदी महासागराच्या इतिहासातील एकाच वर्षात पूर्व मान्सून हंगामामध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात श्रेणी 3 किंवा अधिक तीव्रतेचे चक्रीवादळ निर्माण होण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे.
यापूर्वी 2019 मध्ये अशी स्थिती पाहायला मिळाली होती तेव्हा अरबी समुद्रातील वायू आणि बंगालच्या उपसागरात फॅनी या चक्रीवादळांची नोंद झाली होती.
जून मधील अरबी समुद्रातील सर्वात तीव्र चक्रीवादळे( 1982 पासून)
गेनू चक्रीवादळ ( 145 नॉट्स)
वायू चक्रीवादळ (100 नॉट्स)
बिपरजॉय चक्रीवादळ (105 नॉट्स)