Current Affairs
भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील पहिला सागरी भागीदारी सराव (First maritime partnership exercise between India, France and United Arab Emirates)
- 10/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात(यूएई) यांच्यातील त्रिपक्षीय. सहकार्याने इतिहासात नवीन मैलाचा दगड गाठला असून तिन्ही देशांच्या नौदलांनी पहिलावहिला त्रिपक्षीय संयुक्त सागरी सराव यशस्वीपणे पूर्ण केला. 7 आणि 8 जून 23 रोजी हा सराव करण्यात आला.
या प्रात्यक्षिकाच्या पहिल्या आवृत्तीच्या दरम्यान, सहभागी नौदलांनी सागरावर युद्धाभ्यास केला ज्यात तोफांद्वारे वेध घेण्याचे डावपेच आणि क्षेपणास्त्रांच्या वापरासंबंधी कवायती, अगदी जवळून वापरायचे डावपेच, फ्रेंच विमान राफेल आणि यूएईच्या डॅश 8 एमपीए यांचा सहभाग असलेली प्रगत हवाई संरक्षण प्रात्यक्षिके, हेलिकॉप्टरने क्रॉस लँडिंग संचालन, सागरावर इंधन भरण्याच्या कवायती यांचा समावेश होता.
तिन्ही देशांच्या नौदलांमध्ये सागरी संबंध या सरावामुळे आणखी मजबूत झाले असून सागरी पर्यावरणाला असलेल्या पारंपरिक आणि गैरपारंपरिक धोक्यांचा विचार करण्यासाठी इंटरऑपरेटिबिलिटी(संगणकाच्या सहाय्याने माहितीचे आदानप्रदान) ही वाढवण्यात आली आहे. कोणत्याही देशाच्या अखत्यारीत नसलेल्या सागरी प्रदेशात व्यापार आणि वाहतुकीचे स्वातंत्र्य यांच्या सुरक्षिततेबाबत सुनिश्चितीही करण्यात आली आहे.