Current Affairs
मराठी भाषा विद्यापीठासाठी डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती | Committee headed by Dr. Sadanand More for Marathi Language University
- 12/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे प्रस्तावित मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
पुढील दोन महिन्यात सर्वसमावेशक अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला .
मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आमदार, मराठी साहित्य महामंडळ ,अखिल भारतीय महानुभव साहित्य युवा मंच, जागतिक महानुभाव वासनिक परिषद अशा विविध संघटनांकडून मागणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेची घोषणा केली.
त्यानंतर आता विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने समितीची स्थापना करण्यात आली तसेच या समितीची कार्य कक्षाही निश्चित करण्यात आली.