Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द
राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द
- 11/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
केंद्रीय निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे, तर आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
-
- निवडणूक आयोगाने मार्च 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष ,तृणमूल काँग्रेस, बहुजन समाजवादी पक्ष या राष्ट्रीय पक्षांच्या दर्जाचा आढावा घेतला होता .त्यानंतर निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला.
- दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या जोरावर आम आदमी पक्षाने राष्ट्रीय दर्जा मिळविला आहे.
- बहुजन समाज पक्षाचा राष्ट्रीय दर्जा कायम ठेवण्यात आला आहे.
देशात आता एकूण सहा राष्ट्रीय पक्ष
-
- भारतीय जनता पक्ष
- काँग्रेस
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
- बहुजन समाजवादी पक्ष
- नॅशनल पीपल्स पार्टी
- आम आदमी पार्टी
राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आलेले पक्ष
-
- राष्ट्रीय लोकदल (उत्तर प्रदेश)
- भारत राष्ट्र समिती (आंध्र प्रदेश)
- पीडीएफ (मनिपुर )
- पीएमके (पदुच्चेरी)
- राष्ट्रीय समाज पार्टी (पश्चिम बंगाल)
- एमपीसी मिझोरम
निवडणूक आयोगाने घेतलेले अन्य निर्णय
-
- लोकजनशक्ती पक्षाला नागालँड मध्ये राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा देण्यात आला.
- मेघालयमध्ये व्हॉइस ऑफ द पीपल पक्षाला राज्य पक्ष म्हणून मान्यता
- तृणमूल काँग्रेसचा पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये राज्य पक्षाचा दर्जा कायम राहील
राष्ट्रीय दर्जाचे निकष
-
- किमान चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असणे आवश्यक
- किमान तीन राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत दोन टक्के जागांवर विजय मिळवणे
- लोकसभेमध्ये किमान चार जागा आणि किमान 6% मते किंवा किमान चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत सहा टक्क्यांपेक्षा अधिक मते
- किमान तीन राज्यात लोकसभा निवडणुकीत दोन टक्के जागांवर विजय
- यापैकी कोणतीही एक अट पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा दिला जातो.