Current Affairs
लातूर आणि सोलापूर मधील उपक्रमांना पंतप्रधान पुरस्कार
- 22/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
लातूर जिल्ह्यातील ‘आरोग्यवर्धिनी’ आणि सोलापूर जिल्ह्यातील ‘ऑपरेशन परिवर्तन’ या उपक्रमांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला
वीस लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या पुढाकाराने आयुषमान भारत योजनेअंतर्गत आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मार्फत लातूर जिल्ह्यात विविध सेवा दिल्या जातात.
आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचे निदान , उपचार संदर्भ सेवा इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे.
या सर्व सेवांची व्याप्ती आणि गुणवत्तेच्या निकषावर लातूर जिल्ह्याची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली
सोलापूर जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पोलीस दलाने 2021 – 22 मध्ये ‘ऑपरेशन परिवर्तन’ राबविले होते . यातून सोलापूर जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाचे उच्चाटन करण्यात आले. पोलीस यंत्रणेच्या उपक्रमाला स्थानिकांची यशस्वी साथ लाभली.
या उपक्रमाची दखल घेण्यात आली होती. विद्यमान पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला