Current Affairs
शांतता सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक भिंत उभारण्याची संयुक्त राष्ट्राची घोषणा
- 19/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
विविध संघर्षग्रस्त देशांत प्राणाची बाजी लावून लढा देताना हुतात्मा झालेल्या शांतता सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात एक स्मारक भिंत बनवण्यात येणार आहे.
भारताने याविषयी मांडलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्राने 15 जून 2023 रोजी एकमताने मंजूर केला आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी यूएनजीएमध्ये ‘मेमोरियल वॉल फॉर फॉलन युनायटेड नेशन्स पीसकिपर्स’ नावाने मसुदा प्रस्ताव सादर केला.
न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्र मुख्यालयात शहीद शांतता सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्य भिंत साकारणार आहे.
या भिंतीवर बलिदान देणाऱ्या जवानांची नावे असणार आहेत.
शांतता अभियानात भारताचे 6,000 सैनिक आहेत
संयुक्त राष्ट्राच्या शांतता अभियानात भारत हा तिसरा सर्वाधिक योगदान देणारा देश आहे.
मध्य आफ्रिकन गणराज्य, सायप्रस, कांगो, लेबनॉन, आखातासह विविध देशांत भारताचे 6,000 हुन अधिक सैनिक व पोलीस शांतता अभियानात सहभागी आहेत.
आतापर्यंत 170 भारतीय सैनिकांनी बलिदानही दिले आहे. भारताच्या शहिदांची संख्या इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.