Current Affairs
शाहरुख खान : ‘टाइम पर्सन ऑफ द इयर – 2023’
- 08/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
टाइम मासिकाच्या 2023 च्या शंभर जणांच्या यादीत सुपरस्टार शाहरुख खानने अव्वल स्थान पटकावले आहे.
प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल ,ऑस्कर विजेती अभिनेत्री मिशेल यो आणि मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यापेक्षा वाचकांनी शाहरुख खानला अधिक पसंती दिली.
या यादीसाठी जवळपास 12 लाख वाचकांनी मतदान केले त्यापैकी चार टक्के मते 57 वर्षीय शाहरूख खानला मिळाली.
वर्षातील सर्वात प्रभावी व्यक्ती ठरवण्यासाठी दरवर्षी ‘टाइम’ मासिक आपल्या वाचकांकडून प्रतिसाद मागवते .
शाहरुख खान :
जन्म : 2 नोव्हेंबर 1965
शाहरुखने 1985 -88 दरम्यान हंसराज महाविद्यालयातुन कला शाखेची पदवी संपादन केली आहे.
एक भारतीय अभिनेता, निर्माता व दूरचित्रवाणी प्रदर्शक आहे. बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला शाहरूख हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो
1980 च्या दशकामध्ये फौजी, सर्कस या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये शाहरूखने भूमिका केल्या. 25 जून 1992 रोजी प्रदर्शित दीवाना या चित्रपटाद्वारे त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
शाहरूख खानने 100 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्याला 14 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार 8 वेळा मिळवणारा तो दिलीप कुमारसह दुसराच अभिनेता आहे.
2005 या वर्षी त्याला भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
फ्रान्स सरकार तर्फे Ordre des Arts et des Lettres and Legion of Honour ने शाहरुख खानला सन्मानित करण्यात आले
रेड चिलीज एंटरटेन्मेन्ट ह्या कंपनीचा तो सह-मालक आहे.
भारतीय प्रीमियर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स ह्या संघाचा देखील तो सह-मालक आहे.
2007 साली कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा तो सादरकर्ता होता.
2008 मध्ये न्यूजवीक साप्ताहिकाने शाहरूखला जगातील 50 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले.
2011 मध्ये लॉस एंजेल्स टाइम्स वृत्तपत्राने त्याचा जगातील सर्वात यशस्वी चित्रपट अभिनेता म्हणून गौरव केला.
मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल 2011 मध्ये युनोस्कोच्या पिरामाईड कॉन मॉर्नि पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतातील महिला आणि मुलांच्या मुलांचे हक्कांची वकिली केल्याबद्दल 2018 मध्ये वर्ल्ड इकॉनोमिक फोरमचा क्रिस्टल पुरस्कार देण्यात आला
दुसरा क्रमांक इस्लामी शासनपद्धतीत अधिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी लढा देणाऱ्या इराणी महिलांना मिळाला आहे .
2022 मध्ये 16 सप्टेंबरला इराणमध्ये महसा अमिनी या 22 वर्षीय तरुणीने स्वतःचे केस इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना हवे तसे बांधले नव्हते, म्हणून तिला मारहाण करण्यात आली, त्यात अमिनीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून इराणमध्ये महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये अनेक महिलांनी स्वतःचे केस झाकायला नकार दिला आणि अनेकांनी हिजाब जाळले. या सर्व महिलांना ‘टाईम’ च्या यादीत तीन टक्के मतांसह दुसरे स्थान मिळाले आहे.
ब्रिटनचे राजपुत्र हॅरी यांना तिसऱ्या तर त्यांची पत्नी मेगन मर्केल यांना चौथा क्रमांकाने वाचकांची पसंती मिळाली आहे.
हॅरी यांना 9% मते मिळाली.जानेवारीमध्ये प्रकाशित झालेला त्यांचा ‘स्पेअर’ हा स्मरणग्रंथ चर्चेत राहिला होता. त्यांनी त्यामध्ये राजघराण्यातील अनेक पैलू उघड केले आहेत.
फुटबॉलपटू मेस्सी 8% मतांसह पाचव्या स्थानावर आहे.
अभिनेत्री मिशेल यो, टेनिसपटू सेरेना विल्यम्स, झुकरबर्ग आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनेशीयो लुला दा सिल्वा यांचाही जगभरातील सर्वात प्रभावी शंभर व्यक्तीमध्ये समावेश आहे
टाइम पर्सन ऑफ द इयर :
सुरवात : 1927
पहिले टाइम पर्सन ऑफ द इयर चार्ल्स लिंडबर्ग हे ठरले होते
पर्सन ऑफ द इयर हा अमेरिकेच्या टाइम या नियतकालिकाचा वार्षिक अंक आहे. यामध्ये वर्षाच्या घडामोडीवर चांगला किंवा वाईट परिणाम करणाऱ्या व्यक्ती , संस्था यांची निवड टाइम नियतकालिक करते.
1999 पर्यंत हा सन्मान ‘मॅन ऑफ द इयर’ किंवा ‘वूमन ऑफ द इयर’ म्हणून ओळखला जात होता
2019 मध्ये टाईम प्रकाशनाने ‘पर्सन ऑफ द इयर’ , बिझनेस पर्सन ऑफ द इयर, एथलेटिक ऑफ द इयर, एनटरटेनर ऑफ द इयर चा समावेश केला आहे.