Current Affairs
संसदेत सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक 2023 मंजूर | Cinematograph (Amendment) Bill 2023 passed in Parliament
- 01/08/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, 2023 ला लोकसभेने मंजुरी दिल्याने या विधेयकाला संसदेत मंजूरी मिळाली आहे.
20 जुलै 2023 रोजी राज्यसभेमध्ये हे विधेयक मांडण्यात आले होते आणि त्यावर चर्चा झाल्यानंतर 27 जुलै 2023 रोजी ते मंजूर करण्यात आले.
वर्ष 1984 मध्ये म्हणजे 40 वर्षांपूर्वी सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 मध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या कायद्यात आणखी सुधारणा घडवत संसदेने हे ऐतिहासिक विधेयक मंजूर केले आहे.
विशिष्ट अंदाजांच्या आधारे असे आढळून आले आहे की पायरसी, चित्रपट उद्योगाच्या 20,000 कोटींच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे पायरसीला व्यापक प्रमाणात आळा घालण्याच्या उद्देशाने हे सुधारित विधेयक मांडण्यात आले होते.
अशी असेल शिक्षा:
किमान 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि 3 लाख रुपयांचा दंड अशी कडक शिक्षा देण्यात आली
ही शिक्षा 3 वर्षांचा तुरुंगवास आणि लेखापरीक्षणानुसार चित्रपट निर्मिती खर्चाच्या 5% रकमेइतका दंड अशी वाढवता येण्याची तरतूद यामध्ये आहे.
सिनेमॅटोग्राफ कायद्यातील सुधारणा:
पहिली सुधारणा :- हे विधेयक चित्रपटांचे बेकायदेशीर रेकॉर्डिंग आणि प्रदर्शन करण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करते तसेच इंटरनेटवर या चित्रपटांचे बेकायदेशीरपणे प्रेषण करून पायरसी करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देखील उपाययोजना करते.
दुसरी सुधारणा:- हे विधेयक चित्रपटाच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणन महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करते तसेच चित्रपटांच्या प्रमाणीकरणाच्या वर्गीकरणात सुधारणा घडवून आणते.
तिसरी सुधारणा:- हे विधेयक सिनेमॅटोग्राफ कायद्याला विद्यमान कार्यकारी आदेश, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि इतर संबंधित कायद्यांशी सुसंगत करण्याचा प्रयत्न करते.