Current Affairs
संसद रत्न पुरस्कार – 2023
- 07/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
- लोकसभेतील (8) आणि राज्यसभेतील (5) खासदारांना 2023 च्या संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- या पुरस्काराचे मूल्यमापन 2022 मधील लोकसभेतील हिवाळी अधिवेशन पर्यंतच्या कामगिरीवर करण्यात आलेले आहे
संसदरत्न पुरस्कार विजेते लोकसभेतील खासदार :
1) विद्युत बरन महतो(झारखंड)
2)डॉ. सुकांता मुजुमदार(पश्चिम बंगाल)
3)डॉ. हिना विजयकुमार गावित(महाराष्ट्र)
4)गोपाल चीनया शेट्टी ( महाराष्ट्र)
5)सुधीर गुप्ता (मध्यप्रदेश) – सर्व भारतीय जनता पक्ष
6) कुलदीप राय शर्मा (अंदमान निकोबार),
7)अधीर रंजन चौधरी (पश्चिम बंगाल) – काँग्रेस
8) अमोल कोल्हे (महाराष्ट्र)- राष्ट्रवादी काँग्रेस
संसद रत्न पुरस्कार विजेते राज्यसभेतील खासदार:-
1) डॉक्टर जॉन ब्रिटास (सीपीआय- एम ,केरळ)
2) डॉक्टर मनोज कुमार झा (आरजेडी -बिहार)
3) श्रीमती फौजीया तहसीन अहमद खान (राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र) – तिघेही कार्यरत
4) विश्वंभर प्रसाद निषाद( समाजवादी पार्टी, उत्तर प्रदेश)
5) श्रीमती छाया वर्मा(काँग्रेस, छत्तीसगड)- दोघेही निवृत्त
संसदरत्न पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील खासदार:
1)डॉ. हिना विजयकुमार गावित(भाजप)
2)गोपाल चीनया शेट्टी(भाजप)
3)डॉ.अमोल कोल्हे(एनसिपी)
4)श्रीमती फौजिया खान(एनसिपी)
संसदरत्न पुरस्कारविषयी :
- संसदरत्न पुरस्कारांची स्थापना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांना सन्मानित करण्यासाठी करण्यात आली.
- 2010 या वर्षी संसद रत्न पुरस्काराचे सुरवात झाली.
- 2023 हे संसद रत्न पुरस्काराचे 13 वे वर्ष आहे