Current Affairs
‘सेल्फ- बॅगेज ड्रॉप’ सुविधा देणारी एअर इंडिया पहिली कंपनी | Air India is the first company to offer ‘Self-Baggage Drop’ facility
- 17/09/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी एअर इंडियाने दिल्ली विमानतळावरील टर्मिनल तीन येथे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सेल्फ- बॅगेज ड्रॉप आणि सेल्फ-किऑस्क चेक इन सेवा सुरू केली आहे.
ही सेवा उपलब्ध करणारी एअर इंडिया ही पहिली कंपनी आहे.
सध्या ही सेवा ऑस्ट्रेलियाची विमानसेवा आणि भारतातील सर्व विमानसेवांसाठी उपलब्ध आहे.
यामुळे आता एअर इंडियाच्या प्रवाशांना बोर्डिंग पास प्रिंट करण्यापासून ते बॅगेज टॅग्ज व आपले सामान स्वतःच ड्रॉप करण्यापर्यंत सर्व सेवा डिजिटल पद्धतीने करता येणार आहे.त्यासाठी त्यांना काउंटरवर चेक- इन करायची गरज नाही.
या किऑस्कमध्ये प्रवाशांना सहजपणे आवडीच्या स्वीट्स, फ्रिक्वेन्ट फ्लायर क्रमांक अद्यावत करता येणार आहे.
देशांतर्गत विमानांसाठी डीजीयात्रा हा उपक्रम राबवणे बरोबरच प्रवाशांच्या सोयीसाठी सेल्फ बॅगेज सेवा दिली जाणार आहे.ज्यात त्यांना मदत करण्यापासून विमानतळावर सहज प्रवेश मिळवून देण्यापर्यंत आणि स्वतःच चेक- इन प्रक्रिया करण्यापर्यंतच्या सुविधांचा समावेश आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला एअर इंडियाने ‘प्रोजेक्ट अभिनंदन’ सेवा दाखल केली होती.
ज्यात 16 विमानतळावर प्रशिक्षित अधिकारी प्रवाशांना सहकार्य करत आहेत.