Current Affairs
अमेरिकेतील तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्राचे नोबेल | Nobel Prize in Chemistry for three American scientists
- 05/10/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
तेजस्वी रंगीत प्रकाश किरण फेकणाऱ्या क्वांटम डॉट्स मध्ये पथदर्शी संशोधन करणाऱ्या तिघा अमेरिकन संशोधकांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला .
त्यांच्या या संशोधनामुळे दूरचित्रवाणी संच यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह शस्त्रक्रियांमध्ये क्रांतिकारी बदल घडले.
अमेरिकेतील एमआयटीचे मोंगी बवेंडी, कोलंबिया विद्यापीठातील लुईस ब्रूस आणि नॅनोक्रिस्टल्स टेक्नॉलॉजीमधील अलेक्सी एकिमोव्ह या तिघांची रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने 2023 या वर्षाच्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या तिघांच्या संशोधनातून ‘क्वांटम डॉट्स’ इलेक्ट्रॉन्सच्या प्रतिबंधित हालचालींमुळे प्रकाश शोषून घेण्याच्या तसेच उत्सर्जित करण्याच्या क्षमतेमध्ये अमुलाग्र वाढ झाली आहे.
दूरचित्रवाणी संच तसेच दिव्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या एलईडीमध्ये (लाईट एमिटिंग डायोड)विशेष गुणधर्म प्रस्थापित झाल्याचे सांगण्यात आले.
1) मोंगी बवेंडी:-
जन्म:- 1961, पॅरिस,फ्रान्स
पीएचडी 1988 पासून अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात
सध्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्राध्यापक (अमेरिका)
2) लुईस ब्रूस:-
जन्म:- 1943 , कलेव्हलँड, अमेरिका
1969 पीएचडी, कोलंबिया विद्यापीठ
सध्या कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक
3) अलेक्सी एकिमोव्ह:-
जन्म:- 1945 , रशिया
1974 पीएचडी, सेंट्स पिट्सबर्ग, रशिया
माजी प्रमुख, नॅनोक्रिटीकल्स टेक्नॉलॉजी, अमेरिका