Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > अशोक राणे यांना ‘सत्यजीत रे स्मृती पुरस्कार’ जाहीर
अशोक राणे यांना ‘सत्यजीत रे स्मृती पुरस्कार’ जाहीर
- 03/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
- चित्रपट समीक्षक अशोक राणे यांना 2023 चा ‘ सत्यजीत रे स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
- चित्रपट क्षेत्रातील समीक्षा लेखनात आपल्या सखोल अभ्यासू लिखाणाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- फिप्रेस्की इंडिया या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
- सिनेमातील उत्तमोत्तम लेखन करणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार दिला जातो.
- अशोक राणे हे गेली 46 वर्ष सिनेमा संदर्भात लेखन करीत आहेत. त्यांना या लेखनासाठी आजतागायत तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
- राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अशोक राणे हे ‘सत्यजीत रे स्मृत्ती पुरस्कार’ मिळवणारे पहिले मराठी चित्रपट समीक्षक आहेत.
- यापूर्वी अरुणा वासुदेव(2021) आणि प्रा. शनमुगदास (2022)यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.