Current Affairs
‘ऍनिमिया’ च्या चाचणीसाठी आता “प्रिकलेस हिमोप्रोब”
- 27/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
रक्ताल्पताचा (एनिमिया) आजार ही महिलांमध्ये सर्वाधिक उदभवणारी समस्या असून याची चाचणी करण्यासाठी नेहमी सुई टोचून रक्त नमुना देणे आवश्यक असते. या प्रक्रियेमुळे अनेकांना त्रास होतो तर कित्येकांना संसर्गाचा धोका निर्माण होतो.
यामुळेच चाचणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी पुणे येथील ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजी ‘ मधील इंक्युबेटेड कंपनी नवयुक्त इन्होव्हेशन्सच्या वतीने ‘हिमोप्रोब’ या उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे सुई न टोचविता हिमोग्लोबिन मोजणे शक्य होते.
‘हिमोप्रोब’ हे ‘ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक ‘ उपकरण आहे. सध्या याचे प्रोटोटाईप तयार झाले असून याचे पेटंट डीआयएटीने घेतले आहे.
वैशिष्ट्ये:-
सुई टोचण्याची गरज नाही.
हाताळणे सहज आणि सोपे
जलद आणि विश्वासार्ह
एलसीडी डिस्प्ले
हिमोप्रोब विषयी…
पॉईंट-ऑफ – केअर ऍनिमिया शोधण्याचे साधन
हे रक्ताचे नमुने आवश्यक नसलेले उपकरण
याचा वापर कोणीही करू शकतो व त्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञाची आवश्यकता नाही.
जलद निदानासाठी अत्यंत उपयुक्त
डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्ससाठी उत्कृष्ट
यासाठी प्रयोगशाळेची गरज नाही.
असा होतो वापर…
हिमोप्रोबच्या एलईडी लाईटवर बोट स्थिर ठेवणे
डिस्प्लेवर हिमोग्लोबिन (एचबी) किती हे दिसेल
नख पॉलिश किंवा कृत्रिम नख लावले असेल तर हिमोग्लोबिन रिडींग चुकण्याचीशक्यता.