Current Affairs
‘एपी’, न्यूयॉर्क टाइम्सला पुलित्झर पुरस्कार
- 10/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
असोसिएटेड प्रेस ही वृत्तसंस्था आणि द न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राला युक्रेन युद्धाच्या वार्तांकनाबद्दल 2023 या वर्षाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे .
पत्रकारिता विभागातील बहुतांश पुरस्कार रशियाच्या युक्रेनवरील आक्रमण तसेच अमेरिकेतील गर्भपाताविषयक निर्बंधांशी संबंधित वार्तांकनासाठी देण्यात आले.
‘द असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेला जनसेवा आणि ब्रेकिंग न्यूज छायाचित्रण अशा दोन विभागात बहुमान मिळाला.
रशियाने मारीउपोलवर ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती दर्शवणाऱ्या छायाचित्र मालिकेची प्रशंसा करण्यात आली.
द न्यूयॉर्क टाइम्स ला आंतरराष्ट्रीय वार्तांकनासाठी पुरस्कार जाहीर झाला. युक्रेनमधील बुचा शहरात रशियन सैनिकांनी केलेल्या हत्यांचे वार्तांकन या दैनिकाने केले.
असोसिएटेड प्रेस:
ही एक अमेरिकन नॉन- प्रॉफिट न्यूज एजन्सी आहे. ती सहकारी, असंघटित असोसिएशन म्हणून कार्य करते आणि बातम्यांचे अहवाल तयार करते.
स्थापना : 22 मे 1846
मुख्यालय: न्यूयॉर्क
अध्यक्ष : स्टिव्हन आर. स्वार्ट्झ
मुख्य कार्यकारी अधिकारी : डेझी वीरासिंघम
द न्यूयॉर्क टाईम्स:
न्यूयॉर्क टाईम्स हे न्यूयॉर्क शहरातील दैनिक वृत्तपत्र आहे. दीर्घकाळापासून ते राष्ट्रीय विक्रमी वृत्तपत्र म्हणून ते ओळखले जाते
स्थापना : 18 सप्टेंबर, 1851
मुख्यालय: न्यूयॉर्क
संस्थापक : हेन्री जार्वीस रेमंड, जॉर्ज जोन्स
व्यवस्थापकीय संपादक : मार्क लेसी , कॅरोलिन रायन
जॉर्ज फ्लॉईडवरील पुस्तकाला पुरस्कार:
अमेरिकी पोलिसाच्या अमानुष अत्याचारामुळे बळी गेलेला कृष्णवर्णी नागरिक जॉर्ज फ्लॉईड याच्यावरील पुस्तकाची सर्वसाधारण बिगर काल्पनिक कथा विभागात पुरस्कारासाठी निवड झाली.
सर्वसाधारण बिगर काल्पनिक कथा विभागात रॉबर्ट सॅम्युएल्स आणि टोलुस ओलोरुनीप्पा यांच्या ‘ हीज नेम इज जॉर्ज फ्लॉईड: वन मॅन्स लाइफ अँड द स्ट्रगल फॉर रेशिअल जस्टिस’ या पुस्तकाची निवड झाली .
पुलित्झर पुरस्कार :
पुलित्झर पुरस्कार हा वृत्तपत्रीय ,सदरलिखाण, वाङ्मय आणि सांगीतिक रचनेसाठी दिला जातो.
इ.स. 1917 साली अमेरिकन प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांनी हा पुरस्कार सुरू केला.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे.
दरवर्षी 21 प्रकारच्या साहित्याला हा पुरस्कार दिला जातो.
समाजसेवास्वरूप वृत्तपत्रीय लेखनासाठी एक सुवर्णपदकही असते.
भारतीय वंशाचे पुलित्झर पुरस्कार विजेते:
- गोविंद बिहारी लाल (1937 )
- झुंपा लाहिरी (2000)
- गीता आनंद (2003 )
- सिद्धार्थ मुखर्जी (2011)
- विजय शेषाद्री (2014)
- अदनान अबीदी(2018)
- दानिश सिद्दिकी (2018 )
- मुक्तार खान(2020)
- यासीन दार (2020)
- आनंद (2020)
- अदनान अबिदी, अनुश्री फडणवीस(2020)
- मेघा राजगोपालान(2021)
- निल बेदी(2021)
- अदनान अबिदी, सन्ना इर्शाद मट्टू, अमित दवे, दानिश सिद्दीकी (2022)