Current Affairs
‘एलआयसी’च्या अध्यक्षपदी सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती
- 29/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या अध्यक्षपदी सरकारने सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती केली आहे.
मोहंती हे पुढील वर्षी म्हणजेच जून 2024 पर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार असून त्यानंतर किमान एक वर्षासाठी मुख्य कार्यकारी म्हणून कार्यरत असतील.
मोहंती हे फेब्रुवारी 2021 पासून व्यवस्थापकीय संचालकपदी काम करत होते.
एलआयसी मध्ये १९८५ मध्ये रिक्रुट ऑफिसर म्हणून रुजू झालेल्या मोहंती यांनी विपणन, मनुष्यबळ विकास , विधी अशा विविध विभागांमध्ये यशस्वी कामगिरी केली.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
LIC (Life Insurance Corporation Of India) :-
भारतीय आयुर्विमा महामंडळ ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.
1818 मध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी ही भारतात जीवनविमा व्यवसाय सुरू करणारी पहिली विमा कंपनी.
1928 मध्ये भारतातील जीवन तसेच इतर विम्यांची सांख्यकीय माहिती गोळा करता यावी, यासाठी भारतीय विमा कायदा संमत करण्यात आला.
1956 मध्ये विमा सेवा आणि निधी सेवा पुरविणाऱ्या सुमारे २४५ भारतीय तसेच परकीय कंपन्या भारत सरकारने ताब्यात घेऊन त्यांचे राष्ट्रीयकरण केले .
19 जून 1956 ला संसदेत एलआयसी कायदा संमत करून वरील कंपन्यांच्या एकत्रीकरणातून 1 सप्टेंबर 1956 ला एलआयसी ची स्थापना करण्यात आली.
एलआयसीचे जीवनविम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे.
मुंबईमध्ये एलआयसीचे मुख्यालय असून तिची 8 क्षेत्रीय कार्यालये, 113विभागीय कार्यालये, 2048 शाखा, 54 ग्राहक सेवा केंद्रे व 25 महानगर सेवा केंद्रे आहेत.
ब्रीदवाक्य : ज़िन्दगी के साथ भी, ज़िन्दगी के बाद भी