अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या विधिमंडळाने जातीभेदविरोधी विधेयकाला मंजुरी दिली आहे .
जातीभेदाचे निर्मूलन करून राज्यातील वंचित समाजाचे रक्षण करण्याच्या हेतूने हे विधेयक तयार करण्यात आले आहे.
या विधेयकाला मंजुरी देण्यात आल्यानंतर ते आता गव्हर्नर ग्याविन न्यूसोम यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
भेदभाव विरोधी कायद्यात जातीचा समावेश संरक्षित श्रेणीत करणारे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे .
हे विधेयक प्रथम स्टेट सिनेटवर आयेशा वहाब यांनी सादर केले होते त्याला देशभरातील जाती समानता मानव अधिकार कार्यकर्ते आणि संघटनांनी पाठिंबा दिला होता.
Δ