Current Affairs
केंद्रीय दक्षता आयुक्तपदी प्रविणकुमार श्रीवास्तव यांची निवड
- 30/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
प्रवीण कुमार श्रीवास्तव यांनी 29 मे रोजी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ दिली.
श्रीवास्तव हे आसाम-मेघालय केडरचे 1988 बॅचचे निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत.
सुरेश एन. पटेल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर श्रीवास्तव डिसेंबर 2022 पासून प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कार्यरत होते.
श्रीवास्तव यांनी केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागामध्ये संचालक म्हणून जागतिक व्यापार संघटनेच्या अंतर्गत सेवांच्या व्यापराशी संबंधित वाटाघाटीत मदत केली.
श्रीवास्तव यांनी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी नूतनीकरण मिशनचे सहसचिव आणि मिशन संचालक म्हणूनही काम केले.
गृह मंत्रालयाचे विशेष सचिव आणि अतिरिक्त सचिव म्हणून श्रीवास्तव यांनी भारतीय पोलीस सेवेचे, संवर्ग व्यवस्थापन, केंद्रीय सशस्त्र दल आणि केंद्रशासित प्रदेशांचे कर्मचारी आणि सामान्य प्रशासन यांच्याशी संबंधित प्रकरणे हाताळली
केंद्रीय दक्षता आयोग:
केंद्रीय दक्षता आयोग ही एक सर्वोच्च भारतीय सरकारी संस्था आहे .केंद्रीय दक्षता आयोगाला स्वायत्त संस्थेचा दर्जा आहे .
केंद्र सरकारच्या एजन्सींना सतर्कतेच्या क्षेत्रात सल्ला देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी के. संथानम यांच्या अध्यक्षतेखालील भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीच्या शिफारशीनुसार 11 फेब्रुवारी 1964 रोजी भारत सरकारच्या ठरावाद्वारे केंद्रीय दक्षता आयोगीची स्थापना करण्यात आली.
पहिले केंद्रीय दक्षता आयुक्त निट्टूर श्रीनिवास राऊ हे होते .
वैज्ञानिक दर्जा प्राप्त : 2003
मुख्यालय : नवी दिल्ली