Current Affairs
जागतिक पाणमांजर (ऑटर) दिन
- 31/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
जगभर सर्वत्र आढळणारे पाणमांजर जलीय परिसंस्थेतील महत्वाचा दुवा आहे. ऑस्ट्रेलिया आणि अंटाक्र्टिक वगळता सर्व नद्या, तळी, दलदल, खाडय़ा आणि महासागरांमध्ये पाणमांजराच्या विविध प्रजाती आढळतात.
पार्श्वभूमी:
पाणमांजराच्या संरक्षणासाठी 1993 या वर्षी इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय पाणमांजर बचाव निधी (इंटरनॅशनल ऑटर सर्व्हायव्हल फंड) या संस्थेची स्थापना झाली. त्यातूनच पाणमांजराचे जतन आणि संवर्धन यासाठी जागतिक पाणमांजर दिवसाची सुरुवात झाली.
2014 पासून जगभरात 20 देशांमध्ये मे महिन्याचा शेवटचा बुधवार हा जागतिक पाणमांजर दिवस म्हणून साजरा केला जातो.
उद्दिष्टे:
पाणमांजराचे महत्त्व आणि त्यांनी असलेले धोके सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्याच्या संवर्धनात सर्वांना सामील करून घेणे ही यामागील दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत.
महत्व:
या दिवशी जगभरात अनेक उपक्रम राबवले जातात. पाणमांजराच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्राणीसंग्रहालये, संवर्धन संस्थांमध्ये पर्यावरण अभ्यासकांची व्याख्याने ,कार्यशाळा व परिसंवाद आयोजित केले जातात.
पाणमांजरांचे अधिवास वाचवण्यासाठी व जलप्रदूषण कमी करण्याबद्दल नागरिकांना जागरूक केले जाते .
2023 मध्ये 31 मे रोजी जागतिक पाणमांजर दिवस साजरा केला जात आहे.