Current Affairs
तीन इराणी महिला पत्रकारांना ‘जिलेर्मो कानो पुरस्कार’ जाहीर
- 05/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
इराणी महिलांच्या स्वातंत्र्याची मशाल धगधगत ठेवणाऱ्या निलूफर हमेदी, इलाही मोहम्मदी आणि नर्गेस मोहम्मदी या तीन पत्रकारांना संयुक्तपणे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनी(2 मे) संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेतर्फे (युनेस्को) ‘जिलेर्मो कानो पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
तीन पत्रकारांचा थोडक्यात आढावा:
1)निलूफर हमेदी :-
माशा अमिनी हिचा कोठडीत मृत्यू झाल्याच्या ज्या बातमीने इराणमध्ये आंदोलन सुरू झाले, ती बातमी निलूफर हमेदीने दिली होती.
निलूफर ‘शीघ्र’ या इराणमधील सुधारणावादी दैनिकासाठी लिहितात. माशा अमिनीच्या मृत्यूची बातमी दिल्यानंतर पोलिसांनी लगेचच निलूफर यांना अटक झाली होती.
निलूफर यांना 2023 चा ‘कॅनेडियन जर्नालिस्ट फॉर फ्री एक्सप्रेशन’ हा आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र-स्वातंत्र्य पुरस्कार मिळाला आहे. टाईम च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्येही त्यांचा समावेश करण्यात आला होता
2) इलाही मोहम्मदी :
माशा अमिनीचा संस्कार ज्यावेळी झाला होता ती बातमी इलाही यांनी दिली होती. ‘हम-मिहान’ हे इराणमधील दुसरे सुधारणावादी वृत्तपत्र, त्यामध्ये सामाजिक समस्या आणि लैंगिक समानता याविषयीच्या बातमी इलाही मोहम्मदी देतात.
निलूफरप्रमाणेच इलाही यांनाही अटक करण्यात आली. इलाही यांनाही 2023 चा ‘कॅनेडियन जर्नालिस्ट फॉर फ्री एक्सप्रेशन’ हा आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र-स्वातंत्र्य पुरस्कार मिळाला आहे. टाईम च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्येही निलूफर प्रमाणे इलाही यांचाही समावेश करण्यात आला होता.
3)नर्गेस मोहम्मदी:
नर्गेस यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी पत्रकार म्हणून काम केले आहे . तेहराण मधील ‘डिफेंडर्स ऑफ ह्यूमन राइट्स सेंटर’च्या उपसंचालक म्हणून त्या समाजकार्य करतात.
इराणी महिलांसाठीच्या एव्हीन तुरुंगातच त्या 16 वर्षांच्या कैदेची शिक्षा भोगत आहेत.
मात्र तुरुंगातही त्यांनी लिखाण सुरू ठेवले.इतर महिला कैद्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या,त्यावर आधारित फक्त आधी फारसीत आणि 2022 च्या नोव्हेंबरमध्ये इंग्रजीतही ‘व्हाईट टॉर्चर’ हे नावाचे पुस्तक प्रकाशित झाले.
‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा ‘धैर्य पुरस्कार’ नर्गेस यांना मागच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये मिळाला होता.
जिलेर्मो कानो पुरस्कार:
हा पुरस्कार जगभरात कोठेही वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी किंवा प्रोत्साहनासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना दिला जातो.
सुरवात : 1997
1986 रोजी बोगोटा येथे हत्या झालेल्या कोलंबियन वृत्तपत्र एल एस्पेक्टेडॉर चे संपादक जिलेर्मो कानो इसाझा यांच्या नावावरून हे पारितोषिक दिले जाते.
कानो हे देशातील शक्तिशाली ड्रॅग बॅरन्सचे बोलके टीकाकार होते.