Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > तेलाचे साठे शोधण्यासाठी ‘सी- डॅक’ तर्फे ‘रिव्हर्स टाईम मायग्रेशन’ ची निर्मिती
तेलाचे साठे शोधण्यासाठी ‘सी- डॅक’ तर्फे ‘रिव्हर्स टाईम मायग्रेशन’ ची निर्मिती
- 28/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
समुद्र आणि जमिनीच्या भूगर्भात असलेल्या पाषाणांचा वेध घेऊन दोन्ही लहरींद्वारे त्यात कच्चे तेल आणि वायूचे साठे कोठे आहेत हे शोधून काढणारी प्रणाली प्रगत संगणक विकास केंद्राने(सि – डॅक)विकसित केली आहे.
● आतापर्यंत देशातील तेल, वायू कंपन्यांना या प्रणालीसाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत होते. पण ‘सी- डॅक’ च्या नव्या प्रणालीमुळे कंपन्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होणार आहे.
● ‘ रिव्हर्स टाइम मायग्रेशन’ असे या प्रणालीचे नाव असून समुद्रातील व जमिनीतील भूगर्भातील तेल व वायूंचे साठे ध्वनीलहरींचा अभ्यास करून शोधता येणार आहेत.
● सध्या या प्रणालीची विविध कंपन्यांकडून चाचणी घेतली जात असून पुढील वर्षी ती कार्यान्वित केली जाईल
● आतापर्यंत अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये ही यंत्रणा विकसित करण्यात येत होती .
ओएनजीसी आणि आयआयटी रुरकीचे सहकार्य
● सी – डॅकने नॅशनल सुपर कम्प्युटिंग मशीन अंतर्गत ही स्वदेशी बनावटीची प्रणाली विकसित केली असून त्यासाठी ओएनजीसी आणि आयआयटी रूरकी यांचे सहकार्य मिळाले आहे.
● आयआयटी रूरकीने डेटा च्या अभ्यासासाठी फिजिक्सच्या अचूक पद्धतीबाबत मार्गदर्शन केले असून चाचणी आणि डेटा संदर्भात ‘ओएनजीसी’ मदत करणार आहे.
‘रिव्हर्स टाईम मायग्रेशन’ प्रणाली
● तेलाचे साठे शोधण्यासाठी तेल कंपन्यांकडून जमिनीच्या भूगर्भात कृत्रिम स्फोट घडवून आणले जातात
● या स्फोटातून तयार होणाऱ्या ध्वनी लहरींचा डेटा रिव्हर्स टाईम मायग्रेशन या प्रणालीत समाविष्ट केला जातो
● ध्वनी लहरींच्या आधारे यापूर्वीचा डेटा आणि नवा डेटा याचा एकत्रित अभ्यास करून भूगर्भात कोणत्या भागात तेल, वायूचे साठे असतील याचा अंदाज बांधला जातो
● या अंदाजानुसार संबंधित ठिकाणी खोदकामाच्या सूचना दिल्या जातात
● हा अंदाज अचूक ठरण्याचे प्रमाण 50 ते 60 टक्क्यांच्या दरम्यान आहे