Current Affairs
‘तोफखाना रेजिमेंट’ मध्ये पहिल्यांदाच पाच महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती
- 02/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
भारतीय लष्करामध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर मोहोर उमटविणाऱ्या महिलेने आता तोफखाना रेजिमेंटमध्ये देखील पाऊल ठेवले आहे
भारतीय लष्कराने प्रथमच पाच महिला अधिकाऱ्यांची या रेजिमेंटमध्ये नियुक्ती केली आहे
चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीतील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा या रेजिमेंट मध्ये समावेश करण्यात आला.
तोफखाना रेजिमेंट मधील पाच महिला:
लेफ्टनंट आकांक्षा सैनी ,लेफ्टनंट मेहेक सैनी, लेफ्टनंट साक्षी दुबे ,लेफ्टनंट आदिती यादव आणि लेफ्टनंट पियोस मुदगील
या पाच महिला अधिकाऱ्यांपैकी तिघीजणींची चीनला लागून असलेल्या सीमेवरील युनिटमध्ये नियुक्ती करण्यात आली असून त्यातील दोघीजणी पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील तोफखाना युनिट ची जबाबदारी सांभाळत आहेत
जानेवारी 2023 मध्ये लष्करप्रमुख मनोज पांडेंनी तोफखाना विभागांत महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची घोषणा केली होती.
तोफखाना रेजिमेंट:-
‘तोफखाना रेजिमेंट’ लष्कराला सहाय्यभूत ठरणारा महत्वाचा विभाग आहे.त्याच्या सुमारे 280 शाखा आहेत.
या रेजिमेंटद्वारे बोफोर्स, हॉवित्झर, धनुष, एम-777, आणि के-9 वज्र स्वयंचलित तोफा वापरल्या जातात.
भारतीय लष्कराने आता धोरणात्मक पातळीवर मोठे बदल करायला सुरुवात केली असून तोफखाना रेजिमेंट मधील महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती हा त्याच प्रक्रियेचा भाग आहे.