Current Affairs
धातूच्या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी नासाची मोहीम | NASA mission to study metallic asteroids
- 14/10/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
धातूचे अधिक प्रमाण असलेल्या सायकी या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी आखण्यात आलेल्या अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेच्या म्हणजेच नासाच्या मोहिमेचे भारतीय प्रमाण वेळेनुसार 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजून 39 मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण झाले.
या मोहिमेतून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे पृथ्वीसारख्या ग्रहांचा गाभा कसा तयार झाला याची माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.
फ्लोरिडा येथून स्पेस एक्स कंपनीच्या फाल्कन रॉकेटच्या सहाय्याने यानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले.
जुलै 2029 मध्ये सायकी यान मंगळ आणि गुरूच्या दरम्यान असलेल्या लघुग्रहांच्या कक्षेतून फिरणाऱ्या सायकी लघुग्रहाजवळ पोहचण्याची अपेक्षा आहे.
सायकी हा लघुग्रहांच्या कक्षेतून फिरणारा अत्यंत दुर्मिळ प्रकारचा लघुग्रह आहे.
पृथ्वीवरून केलेल्या निरीक्षणातून सुमारे 280 किलोमीटर लांबीच्या या लघुग्रहावर लोह आणि निकेलचे प्रमाण एकूण वस्तुमानाच्या 30 ते 60 टक्के असल्याचे दिसून आले आहे.
‘सायकी’ च्या अभ्यासातून सूर्यमालेतील ग्रहांची धातूमय केंद्रे कशी तयार झाली असावीत याचा अंदाज बांधता येईल .
यानावावरील उपकरणांच्या साह्याने सायकी वरील मूलद्रव्ये ,धातू ,चुंबकीय क्षेत्र यांचा अभ्यास करण्यात येईल.
तसेच या यानावरील कॅमेरांच्या सहाय्याने या धातूमय लघुग्रहाचे प्रथमच जवळून दर्शन होईल.
‘नासा’ तर्फे प्रथमच दूर अवकाशातील यानाशी संपर्क साधण्यासाठी लेझरचा वापर करण्यात येत आहे.