Current Affairs
नरेंद्र मोदी यांचा ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान | Narendra Modi honored with the highest civilian award ‘Order of the Nile’
- 06/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ हा इजिप्तचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला.
इजिप्तसाठी किंवा मानवजातीसाठी अमूल्य काम करणाऱ्या देशांचे प्रमुख, युवराज आणि देशाचे उपाध्यक्ष यांना 1915 पासून हा सन्मान दिला जात आहे .
पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 13 वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
सन्मानाचे स्वरूप म्हणून सन्मानर्थी व्यक्तीच्या शुद्ध सोन्याची माळ घातली जाते.
या माळीमध्ये तीन चौकोनी आकाराची सोन्याची नाणी असतात .
प्रत्येक नाण्यावर इजिप्त मधील फारोहा काळातील तीन प्रतीके अंकित करण्यात आलेली आहेत.
दुष्टशक्तींपासून संरक्षण , नाईल नदीने आणलेली समृद्धी आणि आनंद ,तसेच संपत्ती अशी ती प्रतीके आहेत.
इजिप्तला भेट देणारे नरेंद्र मोदी हे मागील 26 वर्षातील भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत
कैरोतील ऐतिहासिक मशिदीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट :
इजिप्त मध्ये कैरो येथील 11 व्या शतकातील ऐतिहासिक अल – हकीम मशिदीला भेट दिली.
भारतातील दाऊदी बोहरा समाजाच्या मदतीने या मशिदीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
भेटीदरम्यान मोदींनी फातीमिया काळातील शिया मशिदीला भेट दिली.
ही मशीद सण 1012 मध्ये उभारण्यात आली आहे.
फातीमिया काळाशी भारतात स्थायिक बोहरा समाजाचा संबंध आहे.
इजिप्त मधील भारताचे राजदूत अजित गुप्ते यांनी 1970 पासून भारताचे लोक मशिदीची देखभाल करीत असल्याची माहिती दिली.
इजिप्त भेटीदरम्यान इजिप्त मधील भारतीय समुदायाच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘भारताचे नायक’ असे वर्णन करून त्यांची प्रशंसा केली.