Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > फिनलँड बनले नाटो चे 31 वे सदस्य
फिनलँड बनले नाटो चे 31 वे सदस्य
- 04/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
चर्चेत का आहे?
- फिनलँड आता ‘नाटो’ या पाश्चिमात्य देशांच्या लष्करी आघाडीचा सदस्य झाला असून 4 एप्रिल रोजी फिनलँडचा संघटनेत औपचारिक सदस्य बनेल.
- तुर्कीच्या संसदेने 30 मार्च रोजी मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
- फिनलँडच्या समावेशाने आता नाटोची सदस्य संख्या 31 होत आहे.
- रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर फिनलँड आणि स्वीडन या देशाने 2022 मध्ये नाटोमध्ये सहभागी होण्याची तयारी दाखवली होती.
- ‘नाटो’ बहुतांश देशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
- फक्त तुर्की आणि हंगेरी या देशांचा दोन्ही देशांना विरोध होता.
- फिनलँडच्या समावेशाची प्रक्रियाही नाटोच्या इतिहासातील सर्वात वेगवान प्रक्रिया ठरली.
- संघटनेतील सर्व 30 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.
नाटो (NATO) : North Atlantic Treaty Organization
- सोव्हिएत रशिया विरुद्ध सामूहिक सुरक्षा पुरवण्याच्या उद्देशाने अमेरिका, कॅनडा आणि अनेक पाश्चात्य युरोपियन देशांनी 4 एप्रिल 1949 रोजी उत्तर अटलांटिक कराराद्वारे या गटाची स्थापना केली.
उद्दिष्ट :
- आपल्या सदस्यांचे एकत्रित संरक्षण करणे आणि उत्तर अटलांटिक क्षेत्रात लोकशाही व शांतता राखणे
- नाटोच्या कलम 5 नुसार नाटोच्या सदस्याविरुद्धचा हल्ला हा सर्व मित्र राष्ट्रावरील हल्ला मानला जाईल.
सदस्य: 31
- 31 वा सदस्य : फिनलँड
- 30 वा सदस्य : नॉर्थ मॅसेडोनिया
नाटोचे सदस्य:
अल्बानिया, बेल्जियम, बल्गेरिया, कॅनडा, क्रोएशिया, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, ईस्तोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आईसलँड, इटली,लॅटव्हीआ, लुथीनिया, लक्झमबर्ग, मोंटेयागरो, नेदरलँड, नॉर्थ मसेडोनिया, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्होकीया, स्लोवोनिया, स्पेन, तुर्की, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम