Current Affairs
भारत ,त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यात सामंजस्य करार | Memorandum of Understanding between India and Trinidad and Tobago
- 18/08/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
भारत, त्रिनिदाद आणि टोबॅगो यांनी इंडिया स्टॅक (INDIA STACK) सामायिक करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
उद्दिष्ट:-
इंडिया स्टॅक हे खुले ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) आणि डिजिटल सार्वजनिक वस्तूंचा संग्रह असून, मोठ्या प्रमाणात ओळख, डेटा आणि पेमेंट सेवा उपलब्ध करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे.
क्षमता विकास, प्रशिक्षण कार्यक्रम, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, सरकारी अधिकारी आणि तज्ञांची देवाणघेवाण, प्रायोगिक अथवा प्रात्यक्षिक स्तरावरील उपाययोजनांचा विकास इ. द्वारे डिजिटल परिवर्तनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.
यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी:
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय ई-प्रशासन विभाग, आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली.
इतर देशांबरोबर करारावर स्वाक्षरी:
भारताने यापूर्वीच जून 2023 पासून, इंडिया स्टॅक सामायिक करण्यासाठी आर्मेनिया, सिएरा लिओन, सुरीनाम आणि अँटिग्वा आणि बारबुडा या देशांबरोबर सामंजस्य करार केले आहेत.
तर मॉरिशस, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी यामध्ये स्वारस्य दाखवले आहे आणि ते इंडिया स्टॅक बाबतच्या सहकार्याला अंतिम रूप देण्याच्या पुढील टप्प्यावर आहेत.
अशाच स्वरूपाचा सामंजस्य करार गेल्या महिन्यात पापुआ न्यू गिनीबरोबरही करण्यात आला असून, तो जागतिक स्तरावर या उपक्रमाला मिळत असलेली वाढती पसंती आणि स्वीकृती दर्शवितो.
युपीआय (UPI) हा देखील भारत स्टॅकचा एक भाग असून, फ्रान्स, युएई (UAE), सिंगापूर आणि श्रीलंकेमध्ये त्याला स्वीकृती मिळाली आहे.