Current Affairs
भौतिकशास्त्रासाठी नोबेल – 2023 | Nobel for Physics – 2023
- 04/10/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
विभाजित सेकंदामध्ये अणू आणि रेणू मधील इलेक्ट्रॉनची हालचाल व ऊर्जेचा अभ्यास करणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या तीन संशोधकांना यावर्षीच्या (2023)भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला.
अमेरिकेच्या ओहायो विद्यापीठातील पियर ऍगोस्टीन, जर्मनीच्या म्युनिक विद्यापीठातील फेरेक क्रॉसझ आणि स्वीडन मधील एनी लुहिलीयर यांना यावर्षीचे पारितोषिक विभागून देण्यात येणार आहे.
रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस चे सरचिटणीस हॅन्स एलेग्रेन यांनी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा केली.
स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या सोहळ्यात विज्ञान, अर्थशास्त्राचे पुरस्कार स्टॉकहोमध्ये प्रदान केले जातील.
संशोधनाचे महत्त्व:
पदार्थाच्या प्रत्येक अणूमध्ये त्याच्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉन अत्यंत वेगाने परिभ्रमण करत असतात भौतिकशास्त्रच नव्हे तर रसायनशास्त्र आपले शरीर आणि आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये इलेक्ट्रॉन असतात. मात्र सेकंदाचे काही हजाराव्या भागात या इलेक्ट्रॉनची हालचाल अभ्यासणे नोबेल विजेत्यांच्या संशोधनामुळे शक्य होणार आहे.
त्यामुळे इलेक्ट्रॉनच्या उर्जेची पूरसटशी कल्पना संशोधकांना येणार असून यामुळे विज्ञानाचे एक नवे दालन खुले झाले आहे.
या आधारे अधिक संशोधन झाल्यानंतर त्याचा इलेक्ट्रॉनिक्स तसेच रोगनिदान अशा विविध क्षेत्रांमध्ये फायदा होईल.