Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक
- 29/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
● राज्याच्या मुख्य सचिव पदी ज्येष्ठ सनदी अधिकारी मनोज सौनिकयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
● मावळते मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची मुख्य सेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
● सौनिक हे 1987 च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील अधिकारी आहेत
सौनिक यांनी भूषविलेली महत्वाची पदे
● सौनिक हे मूळचे बिहारचे असून जेष्ठतेनुसार त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड झाली आहे.
● सौनिक हे गेली पाच वर्ष सार्वजनिक बांधकाम, तर चार वर्षे वित्त खात्याच्या सचिव पदांचा कार्यभार भूषवीत आहेत.
● पुणे आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
● 2000 ते 2005 या काळात संयुक्त राष्ट्र संघात प्रतिनियुक्ती
● सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय ऊर्जामंत्री असताना त्यांचे खाजगी सचिव
● केंद्रात संरक्षण उत्पादन विभागाचे सहसचिव
● राज्यात वस्त्रोद्योग, परिवहन विभागाचे प्रधान सचिव अशी विविध पदे सौनिक यांनी 38 वर्षांच्या सेवेत भूषवली आहेत.
श्रीवास्तव यांच्यावर नवी जबाबदारी
● मुख्य सचिव पदावरून निवृत्त होणारे मनुकुमार श्रीवास्तव यांची मुख्य सेवा हक्क आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.