Current Affairs
राज्य सरकारचे “आई” नावाने महिला केंद्रित पर्यटन धोरण (State Govt’s Women Centric Tourism Policy Named “Ai”.)
- 22/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
पर्यटन क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढवितानाच त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यास आणि महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणारे “आई” महिला केंद्रित पर्यटक धोरण सरकारने जाहीर केले.
यामध्ये उद्योजक महिलांच्या कर्जावरील व्याजात सवलत देण्याबरोबरच पर्यटक महिलांसाठी पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्ट मध्ये वर्षातील 30 दिवस 50% सवलत असून महामंडळाचे छत्रपती संभाजी नगर येथील पर्यटन निवास महिलाच चालवतील अशी घोषणा करण्यात आली आहे .
प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचलनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालवलेल्या हॉटेल उपाहारगृह टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी यांसारख्या उद्योगांसाठी बँकांमार्फत घेतलेल्या 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याजाची रक्कम 12% च्या मर्यादित पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा 7 वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाच्या रकमेच्या साडेचार लाखांच्या मर्यादेपर्यंत दरमहा बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे या व्यवसायात 50 टक्के महिला कर्मचारी असाव्यात कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजेत अशी सूचना करण्यात आली आहे.