Current Affairs
सात्विक – चिरागचे ऐतिहासिक विजेतेपद
- 19/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
चिराग शेट्टी आणि त्याचा सहकारी सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले.
सात्विक चिराग जोडीने अंतिम लढतीत जगजेत्या मलेशियाच्या आरोन चिया व सोह वुई यिक जोडीवर 21 -17, 21- 18 असा विजय साकारला.
सात्विक चिरागचे हे कारकिर्दीतील पहिले ‘सुपर 1000’ विजेतेपद असून हा दर्जा असलेल्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे.
सुपर 100, सुपर 300, सुपर 500, सुपर 750 आणि आता सुपर 1000 असा दर्जा असणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जोडी बनण्याचा मानही सात्विक व चिराग यांनी मिळवला आहे.
बर्मिंगहॅम ह्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते
सात्विक चिरागची आतापर्यंतची कामगिरी
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा – सुवर्णपदक
थॉमस चषक – सुवर्णपदक
जागतिक अजिंक्यपद स्पर्धा – कांस्यपदक
स्विस खुली स्पर्धा (सुपर 300)- विजेतेपद
थायलंड ,भारतीय खुली स्पर्धा (सुपर 500) – विजेतेपद
फ्रेंच खुली स्पर्धा (सुपर 750 )- विजेतेपद