Current Affairs
‘स्पेसेक्स’ ची चाचणी अयशस्वी
- 21/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
अमेरिकेतील खाजगी अवकाश तंत्रज्ञान कंपनी ‘स्पेसएक्स’ ने स्टारशिप या मोठ्या प्रक्षेपकाची घेतलेली चाचणी अयशस्वी ठरली
‘स्टारशिप’चे प्रक्षेपण झाल्यानंतर काही मिनिटातच स्फोट होऊन बूस्टरसह प्रक्षेपक समुद्रात कोसळले
‘स्पेसेक्स’ ही प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांची कंपनी आहे .
400 फूट उंचीचे स्टारशिप हा मोठा प्रक्षेपक अवकाशात सोडून पृथ्वी दर्शने करण्याचे ‘स्पेसएक्स’चे उद्दिष्ट होते.
ही केवळ चाचणी असल्याकारणाने प्रक्षेपकावर कोणताही उपग्रह अथवा अवकाश यान नव्हते.
टेक्ससच्या च्या दक्षिण टोकाला मेक्सिकोच्या सीमेजवळ असलेल्या बेटावरून स्टारशीपचे प्रक्षेपण करण्यात आले.
स्टारशीप हा स्पेसेक्स ने तयार केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि शक्तिशाली प्रक्षेपक होता . प्रक्षेपण हवाई बेटा जवळ प्रशांत महासागरात कोसळला
स्पेसेक्स
एक अमेरिकन अंतराळ यान निर्माता आणि उपग्रह संप्रेषण आहे
स्थापना : 14 मार्च 2002
संस्थापक : एलॉन मस्क
मुख्यालय : कॅलिफोर्निया