मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अभिनेता राजकुमार राव याला राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्त केले .
मतदारांना निवडणूकित सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे नेहमी लोकप्रिय प्रसिद्ध व्यक्तीचे राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्ती केली जाते.
आतापर्यंत सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, मेरी कोम, पंकज त्रिपाठी, आमिर खान यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तींनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
तेच काम आता राजकुमार राव करणार आहे.
राजकुमार राव याने न्यूटन या चित्रपटांमध्ये नक्षलग्रस्त भागांमध्ये नेमणूक करण्यात आलेल्या निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका केली होती.
या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करलाही पाठवण्यात आला होता.