सार्वजनिक क्षेत्रातील युको बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अश्वनी कुमार यांची 1 जून पासून नियुक्ती करण्यात आली आहे.
याआधी ते इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक होते. सनदी लेखापाल असणारे अश्वनी कुमार हे अनुभवी बँकर आहेत.
त्यांनी यापूर्वी बँक ऑफ बडोदा ,कॉर्पोरेशन बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक आणि इंडियन बँकेत काम केले आहे .
युको बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस एस प्रसाद यांच्या जागी अश्वनी कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
युको बँक :- (UCO – United Commercial Bank
युको बँक ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे
स्थापना : 6 जानेवारी 1943
संस्थापक : जी. डी. बिरला
मुख्यालय : कोलकाता
मुख्य कार्यकारी अधिकारी: अश्वनी कुमार