भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने दुबई येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत तब्बल 58 वर्षांनी सुवर्णपदक पटकावले.
सात्विक – चिराग जोडीने मलेशियाच्या ओंग येवू सीन – तेओ ए या जोडीचा संघर्षपूर्ण लढतीत 16-21, 21-16, 21-19 असा पराभव करून आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले.
आतापर्यंत भारताने आशीयाई बॅडमिंटन स्पर्धेत 1962 पासून 1 सुवर्ण आणि 17 पदके मिळवले आहेत.
1965 या वर्षी लखनऊ येथे झालेल्या स्पर्धेत भारताच्या दिनेश खन्नाने पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले होते.
आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुषांच्या दुहेरीतील भारताचे हे दुसरे पदक
याआधी दिपू घोष – रामन घोषला 1971 च्या स्पर्धेत दुहेरीत कांस्य पदक मिळाले होते.