पोलंडच्या इगा स्वीअनटेकने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले .
अंतिम लढतीत अग्रमानांकित इगाने चेक प्रजासत्ताक च्या कॅरोलिना मुचोवावर 6-2, 5-7,6-4 अशी मात केली.
जागतिक क्रमवारीत 22 वर्षीय इगा अव्वल स्थानी तर 26 वर्षे केरोलीना 43 व्या क्रमांकावर आहे.
इगाने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले यापूर्वी तिने 2020 आणि 2022 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
इगाचे हे चौथे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले तिने तीन वेळा फ्रेंच ओपन आणि एक वेळेस अमेरिकन ओपन (2022) स्पर्धा जिंकली आहे.
22 वर्षे इगाने चौथे गग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले .
सर्वात कमी वयात महिला एकेरीची चार ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारी 2002 नंतरची पहिलीच खेळाडू ठरली.
यापूर्वी अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने 2002 मध्ये अशी कामगिरी केली होती .