दक्षिण भारतातील राजकीय अस्तित्वासाठी भारतीय जनता पक्षाचा लढा तर राष्ट्रीय राजकारणातील अस्तित्व टिकवण्याचा काँग्रेसचा लढा अशा संघर्षातून 10 मे 2023 रोजी लढल्या गेलेल्या कर्नाटकच्या विधानसभेत काँग्रेस पक्षाने बाजी मारली.
एकूण 73.19 % इतके मतदान झाले होते
काँग्रेसने दहा वर्षानंतर कर्नाटकात 136 जागांवर विजय मिळवून एकहाती विजय प्राप्त केला आहे.
एकूण 224 जागांच्या विधानसभेत काँग्रेसने बहुमताचा 113 चा आकडा सहज पार केला असून भारतीय जनता पक्षाला 65 तर धर्मनिरपेक्ष जनता दलास 19 जागांवर विजय मिळवता आला.
कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्षाने प्रत्येकी एक जागा तर अपक्षांनी दोन जागावर विजय मिळवले आहेत.
कर्नाटकात 1985 पासून सलग दुसऱ्यांदा कोणत्याही पक्षाचे सरकार आलेले नाही.