Current Affairs
जागतिक बँकेच्या लॉजीस्टिक निर्देशांकात भारत 38 व्या स्थानी
- 24/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
जागतिक बँकेच्या लॉजीस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स (एलपीआय) 2023 अर्थात या वर्षातील वस्तुपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थापणातील कामगिरी निर्देशांकात भारताने 139 देशांत 38 वा क्रमांक मिळवला.● तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांत मोठी गुंतवणूक केल्याचा परिणाम म्हणून या यादीत 2018 या वर्षी 44 व्या क्रमांकावर असलेल्या भारताने यावर्षी वरचे स्थान मिळवले.● लॉजीस्टिक धोरण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये आमलात आणले होते.
पायाभूत सुविधांच्या गुणांकनात भारत 47 व्या स्थानी:
● पायाभूत सुविधांच्या गुणांकनात भारताचा क्रमांक 2018 मधील 52 व्या क्रमांकावरून 2023 मध्ये 47 व्या क्रमांकापर्यंत सुधारला आहे.● 2023 च्या अहवालानुसार सिंगापूर आणि फिनलंड हे सर्वात कार्यक्षम आणि सर्वोच्च क्रमांकाचे एलपीआय देश आहेत
लॉजीस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स (LPI):
● लॉजीस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स हे जागतिक बँकेने तयार केलेले परस्परसंवादी बेंचमार्किंग साधन आहे जे देशांना त्यांच्या व्यापार लॉजीस्टिकच्या कार्यप्रदर्शनात कोणकोणत्या आव्हानांना आणि संधींना सामोरे जावे लागते आणि त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी काय करू शकतात हे ओळखण्यात मदत करतात● 2010 ते 2018 पर्यंत हा अहवाल दर दोन वर्षांनी प्रकाशित केला जातो. कोविडमुळे तो 2023 मध्ये प्रकाशित करण्यात आला.
जागतिक बँक:
जागतिक बँक ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे.
स्थापना : 1944
मुख्यालय : वॉशिंग्टन डी. सी.
अध्यक्ष : डेव्हिड मालपास