‘जीएसआय’च्या महासंचालकपदी जनार्दन प्रसाद यांची नियुक्ती
जनार्दन प्रसाद यांची भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय – Geological Survey of India) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रसाद यांनी 1 जून रोजी महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला.
डॉ. एस राजू यांच्या जागी प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजू यांनी 2020 मध्ये पदभार स्वीकारला होता.
प्रसाद यांनी भूगर्भशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.
1988 पासून प्रसाद हे जीएसाआयमध्ये कार्यरत आहेत.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण:
ही भूशास्त्रीय सर्वेक्षण करणारी भारतातील केंद्रीय शासकीय संस्था आहे. हे भारताच्या केंद्रशासनातील खनिज मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
या संस्थेची स्थापना इ.स. १८५१ साली ब्रिटिश भारतात झाली. ही संस्था भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि त्याचा अभ्यास असे कार्य करते.
मुख्यालय: कोलकाता