तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी अध्यक्षपदाची निवडणूक दुसऱ्या फेरीमध्ये जिंकत पुन्हा एकदा स्वतःकडेच सत्ता राखण्यात यश मिळवले.
दुसऱ्या फेरीसाठी झालेल्या मतदानात एर्दोगन यांना 52 % मते मिळाली.(पहिल्या फेरीत 49.52% मते) त्यामुळे ते आता पुढील पाच वर्षे राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत.
या निवडणुकीत सुधारणावादी नेते केमाल क्लुचदारोली यांनी एर्दोगन यांना आवाहन दिले होते मात्र त्यांचा पराभव करून एर्दोगन पुन्हा एकदा तुर्कीच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.
एर्दोगन यांची कारकीर्द:
जन्म :- 16 फेब्रुवारी 1954, इस्तंबूल, तुर्की
एर्दोगन 20 वर्षांपासून सत्तेवर
2003 – 2014 या 11 वर्षांच्या कालावधीत देशाचे पंतप्रधान