जगभरातील आर्थिक अस्थिरता, युक्रेन युद्ध, अशा आर्थिक आव्हानांवर मात करून भारतीय अर्थव्यवस्थेने सन 2022- 23 या आर्थिक वर्षात 2% विकासदर नोंदवला आहे.
गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहित विकासदर 2% होता .
अर्थव्यवस्थेचा एकूण आकार 3.3 लाख कोटी डॉलर झाला असून भारत आशियातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता बनला आहे.
कृषी, उत्पादन, बांधकाम ,सेवा आणि खाण उद्योग या क्षेत्रात झालेल्या दमदार कामगिरीमुळे आर्थिक विकासाला गती मिळाली आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एन.एस.ओ) ने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचेही स्पष्ट होते.
गेल्या आर्थिक वर्षात करांचे संकलन वाढले, सेवा क्षेत्राचीही वाढ झाली. मात्र-आयात निर्यातीत घट झाली.
आर्थिक तिमाहितील विकासदर (टक्केवारीत)
पहिली तिमाही (एप्रिल ते जून 2022):
13.1 %
दुसरी तिमाही(जुलै ते सप्टेंबर): 6.2 %
तिसरी तिमाही(ऑक्टोबर ते डिसेंबर): 4.5%
चौथी तिमाही(जानेवारी ते मार्च 2023): 6.1%