ल्युमिनार टेक्नॉलॉजी चे प्रमुख आणि तरुण अब्जाधीश ऑस्टिन रसेल यांनी फोर्ब्ज या जगप्रसिद्ध मासिकाची निर्मिती करणाऱ्या ‘फोर्ब्ज ग्लोबल मीडिया होल्डिंग्ज’ मधील 82 % हिसिदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे.
रसेल यांचे वय 28 वर्षे आहे.
हा व्यवहार 800 दशलक्ष डॉलर अर्थात जवळपास 6,576 कोटी रुपयांत निश्चित झाला आहे.
हा व्यवहार झाल्यानंतर उर्वरित 18% हिस्सा फोर्ब्ज कुटुंबाकडे राहील .
रसेल यांची कंपनी फोर्ब्जच्या दैनंदिन व्यवहारात सहभागी होणार नाही त्याचवेळी फोर्ब्ज अमेरिकी माध्यमे, तंत्रज्ञान आणि एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने नव्या संचालक मंडळाची स्थापना करणार आहे .
फोर्ब्ज मीडियाचे चेअरमन आणि एडिटर इन चीफ स्टीव्ह फोर्ब्ज नव्या कंपनीत सहभागी होणार आहेत
ल्युमीनार ही प्रसिद्ध ऑटोमोटिव्ह कंपनी असून तिचे बाजार भांडवल 2.1 अब्ज डॉलर आहे.
रसेल यांनी 2012 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी कंपनीची स्थापना केली.
रसेलच्या नावे शंभरहुन अधिक पेटंट आहेत.
कंपनीचा मुख्य उद्देश्य रस्ते अपघात रोखणे हा आहे.
फोर्ब्ज ही अमेरिकेतील सर्वात जुनी आणि मोठी माध्यम क्षेत्रातील कंपनी आहे .
कंपनी दरवर्षी जगातील धनाढ्य व्यक्तींची यादी जाहीर करते.