महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाच्या वतीने यावर्षीपासून (2023) मधमाश्यांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्यस्तरीय ‘मधुमित्र पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात मधमाश्या पालनासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात येत आहे.
पुरस्कार सुरू करण्यामागचा मुख्य हेतू:
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधमाश्यापालनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्रात मधमाश्या पालनाला खूप मोठा वाव आहे.
त्यामुळे राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी मधमाशापालनाकडे वळावे याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि मधमाश्यापालनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात येत आहे.
या पुरस्कारासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना 20 मे रोजी जागतिक मधमाशा दिनानिमित्त गौरविण्यात येणार आहे.