Current Affairs
महाराष्ट्रात इथेनॉलचे 244 कोटी लिटर उत्पादन (Production of 244 crore liters of ethanol in Maharashtra)
- 09/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
महाराष्ट्रातील इथेनॉल प्रकल्पांनी यावर्षी एकूण 244 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे.
इथेनॉल निर्मितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 18 कोटी लिटरने वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी राज्यात 226 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली होती.
यावर्षी ऊस गळीत हंगामात राज्यातील साखर उत्पादन कमी होऊन इथेनॉल उत्पादनात भरीव वाढ झाली आहे.
चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामात सर्व साखर कारखान्यांनी मिळून एकूण 16 लाख टन साखर ही इथेनॉल निर्मितीकडे वर्ग केली आहे.
यामुळेच यावर्षी इथेनॉलचे विक्रमी उत्पादन झाले आहे.
पूर्वी साखर कारखान्यांमध्ये फक्त साखरेचेच उत्पादन होत होते आता साखर कारखान्यांमधून वीज, आसवानी, इथेनॉल, बायोगॅस इत्यादी प्रमुख उपपदार्थांसह सुमारे 35 उपपदार्थांची निर्मिती करणे शक्य झाले आहे.
साखर कारखाने आता इंधन निर्मितीचे कारखाने होऊ लागले आहेत.
कापूस, सोयाबीन नंतर ऊस हे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे पीक झाले आहे
राज्यातील इथेनॉल निर्मिती दृष्टिक्षेपात:
राज्यातील एकूण इथेनॉल निर्मिती प्रकल्प : 163
सहकारी साखर कारखान्याचे प्रकल्प: 54
खाजगी साखर कारखान्याचे प्रकल्प: 71
स्वतंत्र प्रकल्प: 38
प्रकल्पासाठी गुंतवणूक: 21,371 कोटी
तीन वर्षातील इथेनॉलची मागणी व पुरवठा:-
वर्ष मागणी पुरवठा
2020-2021 108 कोटी लि. 97 कोटी लि.
2021-2022 120 कोटी लि. 102 कोटी लि.
2022-2023 132.32को.लि. 48.11को.लि.
—————————————————-
एकूण मागणी 360.32को.लि. 247.11को.लि.