मराठीतील लोक साहित्याचे संशोधन करून लोकसाहित्य प्रकाशित करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी कार्यरत लोकसाहित्य समितीची पुनर्रचना करण्यात आली.
शाहीर हेमंत मावळे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मराठीतील समृद्ध लोकसाहित्याचे संशोधन व जतन करण्याबरोबरच लोकसाहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशातून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी लोकसाहित्य समितीची स्थापना केली होती.
चिं. ग.कर्वे, सरोजिनी बाबर, डॉ.द.ता. भोसले या मान्यवरांनी यापूर्वी समितीचे अध्यक्षपद भूषविले होते.
या समितीच्या माध्यमातून काही ग्रंथांची निर्मिती करण्यात आली असून पारंपारिक बोलीतील लोकगीतांचे दस्तावेजीकरण करण्यात आले आहे.
समितीत 9 सदस्यांचा समावेश:
अध्यक्षांच्या निवडीसह नऊ जणांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
डॉक्टर संगीता बर्वे, भावार्थ देखणे, प्रणव पाटील, डॉक्टर प्रकाश खांडगे, गणेश चंदनशिवे, मोनिका ठक्कर, शेखर भाकरे आणि मार्तंड कुलकर्णी यांचा समितीमध्ये सहभाग आहे.